पिंपरी / चिंचवड

सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई : गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) सायंकाळी पावणे पाच वाजता मोहननगर, चिंचवड येथे करण्यात आली.

प्रकाश गमनाराम चौधरी (वय 34, रा. रामनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह काळुराम लाबुराम देवासी (वय 35, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश चौधरी याने त्याच्या घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली असता पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. आरोपी काळुराम याने प्रकाश याला गुटखा विक्रीसाठी पुरवला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 93 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button