पिंपरी / चिंचवड
पत्नीच्या पोटात लाथा मारून केला गर्भपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून पतीने तिच्यावर अनैसर्गिक संभोग केला. तसेच विवाहिता गरोदर असताना पोटावर लाथा मारून तिचा गर्भपात केला. हा प्रकार 31 मे 2019 ते 3 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.
पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक संभोग केला. विवाहितेचा शारीरिक छळ केला. विवाहिता गरोदर असताना तिच्या पोटावर लाथा मारून तिचा बळजबरीने गर्भपात केला. तसेच साखर पुड्याच्या वेळी आरोपींनी 25 हजार रुपये मागितले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.