breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलख येथील स्मशानभूमीवरुन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची नौटंकी : तुषार कामठे

निवडणुकीच्या तोंडावर सचिन साठे यांच्याकडून दिशाभूल
आधुनिक सुविधांयुक्त स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपळे निलख येथे २०१८ मध्येच नवीन स्मशानभूमीचे काम सुरू झाले आहे. महापालिका प्रशसानाने जुन्या स्मशानभूमीचे पत्रा शेड हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाचा (एनजीटी) अडथळा येत आहे. त्यामुळे नागरिक जुन्या स्मशानभूमीचा वापर करतात. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन साठे जुन्या स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित करुन राजकीय नौटंकी करीत आहेत, अशी टीका माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
जुन्या स्मशानभूमीचे पत्रा शेडचे काम करण्याबाबत काँग्रेसचे नेते सचिन साठे यांनी जनसंवाद सभेत मुद्दा उपस्थित केला. तसेच, महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर स्माशानभूमीचे राजकारण करीत भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेवकांवर टीकाही केली.
यावर प्रत्त्युत्तर देताना माजी नगरसेवक तुषार कामठे म्हणाले की, पिंपळे निलख येथील नव्या स्मशानभूमीसाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २०१८ मध्येच स्मशानभूमीचे काम चालू करण्यात आले. त्यामध्ये ४ बेडची अंत्यविधी शेड तयार आहे. मात्र, नागरिक जुन्या स्मशानभूमीचा वापर करीत आहेत.
वास्तविक, जुनी स्मशानभूमी हटवण्यात येणार आहे. पत्रा शेडही काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाच्या तांत्रिक अडचणींमुळे जुनी स्मशानभूमी हटवण्यात आलेली नाही. तसेच, संबंधित ठेकेदाराला प्रशासनाने काळ्या यादीत टाकल्यामुळे काम थांबले होते. मात्र, आगामी काळात अत्याधुनिक सुविधा असलेली स्मशानभूमी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. नव्या स्मशानभूमीच्या सीमाभिंतीचे काम पूर्ण झाले आहे. स्ट्रीटलाईट पोल बदलले आहेत. गोसावी समाजाची दफनभूमी सुशोभित केली आहे. अन्य कामांसाठी निविदा प्रक्रिया होणार असून, लवकरच कामे मार्गी लागणार आहेत, असा दावाही तुषार कामठे यांनी केला आहे.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची बोगसगिरी…
कोविड काळात लोकांचा जीव संकटात असताना भूमिगत झालेले स्थानिक काँग्रेसचे नेते निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले आहेत. त्यामुळे जुनी स्मशानभूमी आणि नवीन स्मशानभूमी यातील फरक त्यांच्या लक्षात आला नसेल. सौरउर्जा प्रकल्प, प्रार्थना हॉल, दशक्रिया विधीसाठी जागा यासह नदीलगतच्या भागाचे सुशोभिकरण करण्याचे काम प्रस्तावित आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे पुन:परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच, कोविड काळात विकासकामांना विलंब झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला दोष देण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बोगसगिरी करु नये, असा घणाघातही माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button