क्रेनच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Accident-2.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध व्यक्तीचा क्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी सव्वादहा वाजता नवलाख उंबरे येथे घडली.
सोपान तानाजी पडवळ (वय 80, रा. नवलाख उंबरे, त. मावळ) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास गोविंद पडवळ (वय 58, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महंमद जमशेद महंमद कासीम (वय 26, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील क्रेन रत्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवले. मयत सोपान पडवळ हे पायी रस्ता ओलांडत असताना त्यांना क्रेनची धडक बसली आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी क्रेन चालक आरोपीला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.