breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘लाडकी बहीण’ साठी एक खिडकी योजना राबवावी’; निलेश तरस

चिंचवड मध्ये शिंदे सरकारचे अभिनंदन व शिवसेनेचा आनंद उत्सव

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवत ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना वेळेत मिळावा यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्फत आपण करणार आहोत असे शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस यांनी सांगितले.

शिंदे सरकारने एक जुलैपासून राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अनुदान व वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या निमित्त शिंदे सरकारचे अभिनंदन करीत चापेकर चौक, चिंचवड येथे शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 20 ठिकाणी रेशन दुकानांना मिळणार मंजुरी

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख शैलजा पाचपुते, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, दिलीप पांढरकर, खंडूशेठ चिंचवडे, महिला शहर संघटिका सरिता साने, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शहर युवा प्रमुख प्रदीप पवार, उपजिल्हा युवा प्रमुख हर्षवर्धन पांढरकर, सायली साळवी, प्रशांत कडलग, दिलीप कुसाळकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, , महेश कलाल, नारायण लांडगे, मुकुंद ओव्हाळ, ऋतू कांबळे, सुवर्णा कुटे, जय साने, सोनाली वाल्हेकर, दुर्गा पांढरकर, अश्विनी बागुल, उज्वला तोमर, श्वेता कापसे, मीनल भालेराव, पौर्णिमा अमराव, सुनीता शर्मा, शारदा वाघमोडे, सुवर्णा तडसरे, उषा म्ह, रंजना सोनवणे, शकुंतला जाधव, संगीता परदेशी, चक्रवर्ती वर्मा, प्रयाग बहिरट, सय्यद पटेल, सागर पुंडे, रुपेश चांदेरे आदी उपस्थित होते.

शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस म्हणाले की, शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर म्हणाले की, सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये नाव लिहिताना प्रत्येकाने आपल्या नावापुढे आईचे नाव लिहावे, असा कायदा करून शिंदे सरकारने महिलांचा सन्मान केला आहे, आता लाडकी बहीण योजना म्हणजे दिवाळीपूर्वीच महिलांना दिलेली भाऊबीज आहे. तसेच महिलांना वर्षभरात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असेही आवाहन दिलीप पांढरकर यांनी केले या योजनेच्या लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असेही पांढरकर यांनी सांगितले. युवतीसेना शहर प्रमुख रितू कांबळे यांनी आभार व्यक्त केले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button