Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

WPL 2026चे वेळापत्रक जाहीर; ९ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात, अंतिम सामना ५ फेब्रुवारीला

WPL 2026 Full Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी महिला प्रीमियर लीग 2026 (WPL) च्या चौथ्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेला ९ जानेवारी 2026 पासून सुरुवात होणार असून ५ फेब्रुवारीला वडोदरा येथे अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेतील सामने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. नवी मुंबईत होणारे सामने ९ ते १७ जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पुढील सामने आणि प्लेऑफ्स आणि फायनलचा सामना देखील वडोदरात खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने १ फेब्रुवारीपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ३ दिवसांची विश्रांती असेल. जो संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी असेल, तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेला संघ एलिमिनेटरचा सामना खेळणार. त्यानंतर ५ फेब्रुवारीला स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल.

हेही वाचा      :        ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर’ सायकलिंग स्पर्धेकरिता सर्व सुविधांसह सुरक्षेचे काटेकोर व्यवस्थापन करा; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार 

संपूर्ण वेळापत्रक

९ जानेवारी: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
१० जानेवारी: यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१० जानेवारी: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
११ जानेवारी: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१२ जानेवारी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
१३ जानेवारी, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंटस, नवी मुंबई
१४ जानेवारी: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
१५ जानेवारी: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
१६ जानेवारी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंटस, नवी मुंबई
१७ जानेवारी: यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, नवी मुंबई
१७ जानेवारी: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
१९ जानेवारी: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
२० जानेवारी : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
२२ जानेवारी: गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
२४ जानेवारी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२६ जानेवारी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
२७ जानेवारी: गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२९ जानेवारी: यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
३० जानेवारी: गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
१ फेब्रुवारी: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
३ फेब्रुवारी: एलिमिनेटर, वडोदरा

५ फेब्रुवारी: फायनल, वडोदरा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button