पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात विकासाचा नवा अध्याय : अनिताताई काटेंचा नववर्षी निर्धार
मिशन- PCMC : प्रभाग 28 मध्ये भाजपाच्या पॅनेलला वाढता प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये यंदाच्या निवडणुकीत सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रभागाच्या कायापालटाचा स्पष्ट संकल्प मांडला.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील विविध भागांत नागरिकांशी संवाद साधताना अनिताताई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासकामांना गती देण्याचे सविस्तर नियोजन तयार करण्यात आले आहे. “विकास हा निवडक लोकांसाठी नव्हे, तर संपूर्ण प्रभागासाठी असला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाचा घेतला आढावा
प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा उल्लेख करताना त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता व्यवस्था, पथदिवे, वाहतूक नियोजन, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने तसेच आधुनिक व्यायामशाळा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. यासोबतच महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आणि तरुणांसाठी क्रीडा व करिअर मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“नवीन वर्ष २०२६ हे नव्या आशा, नवे यश आणि आनंद घेऊन येवो,” अशी सदिच्छा व्यक्त करत अनिताताईंनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान अनेक मतदारांनी “यंदा बदल हवा – नवा” असा उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. “फक्त घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम – हेच आमचं वचन,” असे ठामपणे सांगत अनिताताई काटे यांनी पुढील काळात नागरिकांच्या सूचनांवर आधारित विकासकामे राबविण्याचा विश्वास दिला. नववर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने प्रभागात भाजपमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रभागाचा विकास हा शब्दांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अनुभवता यावा, हाच माझा निर्धार आहे. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.
– अनिता काटे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 28, रहाटणी- पिंपळे सौदागर.




