पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा भव्य देखावा
कीर्तीताई मारुती जाधव युथ फाउंडेशन आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांचे आयोजन

पिंपरी चिंचवड | कीर्तीताई मारुती जाधव युथ फाउंडेशन आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, पिंपरी चिंचवड शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना जाधव म्हणाल्या नवरात्रोत्सव हा एक अत्यंत पवित्र व्रत आहे, ज्यामध्ये देवीच्या विविध प्रतिमांचे दर्शन घडते आणि भक्तीभाव जागृत होतो. भारतातील सर्व शक्तिपीठांमध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे विशेष स्थान आहे. याच शक्ती रूपाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न यंदा आम्ही केला आहे.
हेही वाचा : PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये ५ लाख मतदार वाढले!
साडेतीन शक्तिपीठांमध्ये समावेश असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई, तुळजापूरच्या तुळजाभवानी माता, माहूरच्या श्री रेणुकादेवी आणि सप्तशृंगी माता यांचा भव्य देखावा पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळेल. हे शक्तिपीठ भक्तांना अतिशय आकर्षक व भव्यपणे सादर केले गेले आहेत, जे नवरात्रोत्सवाच्या रंगात आणखी भर टाकतात.
संयोजिका जाधव यांनी सर्व देवी भक्तांना आव्हान केले आहे की, ते या देखाव्याचे दर्शन घ्यावेत आणि नवरात्रोत्सवाच्या आध्यात्मिक अनुभवाचा लाभ घ्यावा.





