Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राजमाता जिजाऊ कॉलेजचे घवघवीत यश!

शिक्षण विश्व: बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नैपुण्य

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

भोसरी लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आँनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २४-२५चा निकाल शाखा निहाय पुढीलप्रमाणे १२ वी कला शाखेचा निकाल ८९% १२ वी वाणिज्य ( मराठी माध्यम) शाखेचा निकाल ९०.८१% इ.१२ वी वाणिज्य (इंग्रजी माध्यम). ९६.३५% इ १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १००% इतका लागला आहे.

हेही वाचा   :    कुख्यात गुंडाला विधानसभा उपाध्यक्षांनी भरवला केक!

परीक्षेत यश संपादन करणारे शाखानिहाय विद्यार्थी खालीलप्रमाणे: कला शाखा प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी पूनम सावंत विश्वास ८२.३३%, सागर सुरेश ७७.६७%, शाही हरिकला ७५.५०%, वाणिज्य ( मराठी माध्यम) प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी , फावडे अमृता ७७.८३ %, साळुंखे मनीषा ७६.३३ %, सोनवणे विजय ७३.३३%. वाणिज्य (इंग्रजी माध्यम) कुमारी राणे सिद्धी संतोष ८६.००%, गौंड रितू सुनील कुमार ८२.५०%, खेडकर तनिष्क मंगेश ८१.१७%, विज्ञान शाखा प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी कुलकर्णी अथर्व विनायक ८३.६७%, जगदाळे शुभदा लालासाहेब ८१.००%, वाडेकर प्रज्ञेश ७७.६७%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष , माजी आमदार विलास लांडे यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सचिव सुधीर मुंगसे , खजिनदार अजित गव्हाणे, विश्वस्त विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. जी. कानडे,उपप्राचार्य प्रा किरण चौधरी, उपप्राचार्या डॉ नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण , सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button