TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

गणरायाला भावपूर्ण निरोप…

  • पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात भव्य विसर्जन मिरवणूका
  • महापालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी मंडळांचे स्वागत

पिंपरी: – “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” आणि “गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा घोषणा देत पिंपरी आणि चिंचवड परिसरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
उत्साही आणि आनंदी वातावरणात पारंपरिक ढोल ताशा पथक, शिवकालीन युध्दकलांची प्रात्यक्षिके, मल्लखांब, आकर्षक रथ सजावट अशा विविध स्वरूपात चिंचवड त्याचप्रमाणे पिंपरी येथे जल्लोषात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते स्वागत करून विसर्जन सोहळ्याची सुरूवात झाली.
महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील कराची चौक आणि चिंचवड येथील हुतात्मा चापेकर चौक येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये पिंपरी येथील सुमारे ४० प्रमुख तर चिंचवड येथील सुमारे ३४ गणेश मंडळांचा समावेश होता. चिंचवड येथील नियंत्रण कक्ष येथे आयुक्त शेखर सिंह त्यांच्या पत्नी ईशा सिंह, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रिय अधिकारी सोनम देशमुख तसेच माजी सत्नतारूढ पक्षनेते नामदेव ढाके,माजी नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, शामराव वाल्हेकर, गोविंद पानसरे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्या माया बारणे,माधुरी उर्फ मीनाताई कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे पाटील, स्विकृत सदस्य ॲड.मोरेश्वर शेडगे,विठ्ठल भोईर यांनीही गणेशमंडळ प्रमुखांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


तर पिंपरी येथील नियंत्रण कक्ष येथे आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह, उप आयुक्त रविकिरण घोडके,
मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रभारी प्रशासन अधिकारी शशिकांत जगताप यांच्यासमवेत माजी महापौर कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी देखील मंडळांचे स्वागत केले.
महापालिकेच्या कर्मचा-यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले होते. सूत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि किशोर केदारी यांनी केले.
मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोलताशांच्या गजरात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी अशा शिवकालीन साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आले. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, शहरातील इतर विसर्जन घाटांवर देखील गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button