दिव्यांगांच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना पावती सादर करण्यास मुदतवाढ
![Excitement over Corona Positive Contractor's move in the municipality](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/pcmc-1-5.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन (चलन-वलन) घेणेकामी अर्थसहाय्य” या योजने राबविली जाते. त्यांतर्गत २०१९-२० मध्ये ज्या लाभार्थ्यांचा अर्ज पात्र ठरलेला आहे. त्यांना जीएसटी पावती जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन खरेदी करुन महापालिकेकडून अर्थसहाय्य मिळणेकामी, साधन खरेदी केलेची मुळ GST पावती महापालिकेकडे जमा केली नाही. अशा लाभार्थ्यांनी ६ ते १२ मार्च २०२१ या कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माहिती केंद्रामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत सदर पावती जमा करावी, असे अवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या लाभापासून शहरातील एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीतजास्त पात्र अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे अवाहन नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.