Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, ग्रामस्थ अन्‌ गणेश मंडळांचा पुढाकार

पिंपरी- चिंचवड : भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन क्रिडांगण महादेव मंदीर, लांडगे आळी येथे दि. 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत भाविकांना कीर्तन महोत्सवाचा आनंद घेता येईल. या महोत्सवात दि. 20 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. रोहीत महाराज बोराटे (मोशी), दि. 21 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे (शिवचरित्रकार), दि. 22 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपुर) दि. 23 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले (संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज) एकादशीनिमित्त दि. 24 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. माउली महाराज कदम (छोटे माउली) दि. 25 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे (लांडवाडी, मंचर) महाशिवरात्रीनिमित्त दि. 26 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. श्रीकांत महाराज गागरे (राहुरीकर), दि. 27 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे कीर्तन होणार आहे.

हेही वाचा –  ‘युफोरिया वार्षिक स्नेह संमेलन”तून विद्यार्थ्यांमधील प्रतिभेचा जागर!

भाऊसाहेब लांडे यांच्यातर्फे अन्नदान

दरम्यान कै. धोंडीबा रामभाऊ लांडे (पाटील) यांच्या स्मरणार्थ काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत भाविकांना हरिपाठासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच, भाऊसाहेब लांडे यांच्यातर्फे अन्नदान करण्यात येणार आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, पठारे-लांडगे तालीम मंजळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोजेश्वर मित्र मंडळ, माळी आळी मित्र मंडळ संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय-तुकोबाराय प्रतिष्ठाण, नामस्मरण भजनी मंडळ, जयहनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री संत सावता माळी महाराज प्रतिष्ठाण आणि समस्त ग्रामस्थ भोसरी विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button