पिंपरी / चिंचवडपुणे

कंपनीतील कामगार महिलेचा दोन कामगारांसह सिनियर सुपरवायझरने केला विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीत काम करत असताना दोन कामगारांनी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तर कंपनीतील सिनियर सुपरवायझरने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ऑक्टोबर ते 17 डिसेंबर या कालावधीत नाणेकरवाडी येथील एका कंपनीत घडली.

आनंद बाबर, अक्षय पन्हाळकर, तुषार उगले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. आनंद आणि अक्षय या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला प्रोडक्शन लाईनवर काम करत असताना तिथेच काम करणा-या आरोपी आनंद आणि अक्षय या दोघांनी जाणीवपूर्वक फिर्यादींसोबत गैरवर्तन केले. अश्लील टॉण्ट मारून फिर्यादीचा विनयभंग केला.

17 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपी सिनियर सुपरवायझर तुषार उगले याने फिर्यादी सोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आनंद आणि अक्षय या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button