पिंपरी / चिंचवड

चिंचवडगावात 57 हजारांची घरफोडी

पिंपरी l प्रतिनिधी

चिंचवडगावात एका घरातून 57 हजार 200 रुपयांचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरीला गेली. घरफोडीची ही घटना रविवारी (दि. 29) मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजताच्या कालावधीत घडली.

अखिलेशकुमार रघुनाथसिंग (वय 52, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल आत्माराम लालझरे (वय 34, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी पहाटे बंद असताना आरोपी अतुल याने घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातून 6.100 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण 57 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button