पालिकेच्या तोतया सुरक्षा अधिका-याला ठोकल्या बेड्या
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना फसविण्याचा प्रयत्न करणा-या एका तोतयाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
संदेश रामचंद्र जाधव (वय 21, तानाजी नढे, चाळ क्रमांक.4, बाज प्रभु चौक, काळेवाडी गावठाण), असे अटक केलेल्या तोतया सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई एस. पी. बाबा यांनी फिर्याद दिली आहे.
काळेवाडीत आरोपी जाधव मी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगमध्ये पीसीएमसी लिहिलेला मोनोगॅ्रम, एक लाकडी तांबड्या रंगाची केन, काळ्या रंगाचा पट्टा, संदेश जाधव नावाची नेम प्लेट, चार स्टार दोन पीसीएमसी बॅच, एक खाकी रंगाचे लाईन यार्ड असे साहित्य जप्त करून त्याला अटक केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.