ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात आज नवीन 130 रुग्णांची नोंद; 216 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 130 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 216 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 58 हजार 118 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 202 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 122 रुग्ण गृहविलगीकरणात असून 80 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 19 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 845 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 155 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 33 लाख 79 हजार 53 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button