पिंपरी / चिंचवड

पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती टेम्पोच्या चाकाखाली आली

पिंपरी | प्रतिनिधी : गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा हँडब्रेक लावण्यास चालक विसरल्याने टेम्पो अचानक मागे सरकला. या टेम्पोखाली चिरडल्याने ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १६ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास सोमाटणे फाटा परिसरात घडली.

ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो उतारावर होता. मात्र चालकाने टेम्पोचा हँडब्रेक व्यवस्थित लावला नाही. त्यामुळे काही वेळातच टेम्पो अचानक मागे सरकू लागला.

हेही वाचा : रुग्णांना वेठीस धरणाऱ्या रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई

त्यावेळी ज्ञानेश्वरी मुऱ्हे ही परिसरातील इतर मुलांसोबत रस्त्यालगत खेळत होती. टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती टेम्पोच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. निष्काळजीपणामुळे चिमुरडीचा जीव गेल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली.

नागरिकांचा संताप उफाळला

या घटनेनंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. “निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडतील,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निष्काळजीपणामुळे वाढते अपघात

वाहने उतारावर उभी करताना हँडब्रेक न लावणे किंवा सुरक्षितता नियमांचे पालन न करणे ही गंभीर बाब आहे. अशा छोट्या वाटणाऱ्या चुका जीवघेण्या ठरू शकतात. प्रशासनाने याबाबत कडक अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button