पिंपळे सौदागर येथे 10 लाखांची घरफोडी : दहा तोळे सोने, 30 तोळे चांदी चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/gold-thief_thinkstock_759.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथे तीन चोरट्यांनी घरफोडी करून दहा लाखांचे दागिने चोरून नेले. त्यात 20 तोळे सोन्याचे आणि 30 तोळे चांदीचे दागिने होते. हा प्रकार रविवारी (दि. 27) पहाटे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास घडला.
आशिष अमृतलाल गटागट (वय 37, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपळे सौदागर येथे लक्षद्वीप पॅलेस येथे सदनिका आहे. त्यांचे घर रविवारी रात्री कुलूप लाऊन बंद होते. रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये 20 तोळे सोन्याचे आणि 30 तोळे चांदीचे दागिने होते. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.