breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हेल्दी आणि फीट लाईफस्टाईलचा अवलंब करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासियांना आवाहन

पिंपरी | टीम ऑनलाईन

सध्या, राष्ट्रपती रामनाथ कोविंद केंद्रशासित प्रदेश असलेल्या दीवमध्ये आहेत. इथं त्यांनी आपला चार दिवसांचा दौरा आयोजित केला आहे. सोमवारी राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते दीवच्या घोघ्ला समुद्रकिनाऱ्यावर सकाळी-सकाळी जॉगिंग करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबतच रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना हेल्दी आणि फीट लाईफस्टाईलचा अवलंब करण्याचा सल्लाही दिलाय.

राष्ट्रपती भवनकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत राष्ट्रपती रामनाथ कोविंद दिसत आहेत. ‘आपल्या सगळ्यांचीच परीक्षा पाहणाऱ्या वर्षानंतर आता आपण २०२१ मध्ये प्रवेश करत आहोत. चला आपण एकत्र येऊ फीट आणि निरोगी राहण्याचा संकल्प करू. पुढचं वर्ष आपल्या आयुष्यात चांगलं आरोग्य आणि समृद्धी घेऊन यावं, हीच आशा आहे’ असं या व्हिडिओसोबत म्हटलं गेलंय. राष्ट्रपती शुक्रवारी दीवला दाखल झाले होते. सोमवारी दुपारी ते दिल्लीला परतणार आहेत. आपल्या या चार दिवसांच्या भेटीत राष्ट्रपतींनी रविवारी घोघ्ला समुद्रकिनाऱ्याला भेट दिला. यावेळी त्यांनी दीव किल्ल्यावरील लाईट अँड साऊंड शोचंही उद्घाटन केलं.

राष्ट्रपती घोघ्ला समुद्रकिनार्‍यावरील स्वच्छता पाहून भारावून गेले होते, असं एका सरकारी निवेदनात म्हटलं गेलंय. दरम्यान, अलीकडेच या समुद्रकिनाऱ्याला डेन्मार्कच्या एका पर्यावरण एजन्सी असलेल्या ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्मेंट एज्युकेशन’कडून ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. शनिवारी राष्ट्रपतींनी अनेक योजनांचं उद्घाटन केलं. तसंच अनेक प्रकल्पांची पायाभरणीलाही हजेरी लावली. राष्ट्रपतींना सौदवाडी इथं शाळा उभारणी, दीव सिटी वॉल वर १.३ किमी लांबीचा हेरिटेज वॉक-वे विकास, फोर्ट रोडच्या फळ आणि भाजीपाला बाजार सुधारणा अशा अनेक योजनांची सुरुवात केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button