breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हितेश मुलचंदानी खूनप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

  • पोलिसांनी आणखी दोघांना केली अटक 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना गुरुवारी (दि. २५) न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार, दि. ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते.अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय २५, रा. शितोळेनगर, सांगवी) व योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय २०, रा. पिंपळे गुरव) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि आरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पायसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पायसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील त्यांच्याकडून जप्त केली. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button