हिंजवडीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू
![NCRB report Mumbai at second in crime against women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/crime-1-1.jpg)
हिंजवडी – भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील मुंबई-बेंगलोर महामार्गावरील हॉटेल लकी द इनवायटेड गार्डन नर्सरीसमोर घडली.
राम दत्तु इल्लाळे (वय ४०, रा. पवारवस्ती, ताथवडे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश राम इल्लाळे (वय १९, रा. ताथवडे, पवारवस्ती) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अॅक्टीव्हा दुचाकी (क्र.एमएच/१४/ईजी/६५६०) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१० जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास राम इल्लाळे हे मुंबई-बेंगलोर महामार्गावरील हॉटेल लकी द इनवायटेड गार्डन नर्सरीसमोरील रस्त्याने त्यांच्या पॅशन दुचाकी (क्र.एमएच/१४/जीई/०५०७) वरुन चालले होते. यावेळी भरधाव वेगाने समोरुन येणाऱ्या अॅक्टीव्हा दुचाकी (क्र.एमएच/१४/ईजी/६५६०) वरील अज्ञात चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत राम यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. तर आरोपी अॅक्टीव्हा चालक पसार झाला. हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.