हाळदगावातील नागरिकांसाठी माळेकर परिवारातर्फे पाण्याचा टँकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190610-WA0007.jpg)
- ग्रामस्थांवरील पाणी टंचाई होणार दूर
- गोपाळ माळेकर यांनी घेतला पुढाकार
पिंपरी, (महाईन्यूज) – उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील हाळदगावात नागरिकांवरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ काशिनाथ माळेकर यांच्या परिवाराने गावाला पाण्याचा टँकर विनाशूल्क उपलब्ध करून दिला. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
पाण्याचा टँकर माळेकर यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 6) देण्यात आला. त्याचे उद्घाटन हाळदगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सयाजी सावंत, सुरेश सावंत , सिताराम गुंड, शरद पाटील, गंगाधर जावळे, रामेश्वर गुंड, हरिश्चंद्र जावळे, चांगदेव पाटील, भिमराव जाधव, वसंत सावंत, श्रीहरी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गोपाळ माळेकर व जयश्री माळेकर यांच्या शुभहस्ते नळ चालू करूण घागरी भरण्यास सुरूवात करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामराजे सावंत, सचिन सावंत, अमोल जाधव, विश्वनाथ माळेकर आदींसह गावातील सर्व तरूणांनी मदतीचा हात दिला.
- जनसेवा हिच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे आपल्या मुळगावी आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले. आपण गावचे काहितरी देणे लागतो, ही जाण प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. हाळदगावमधील नागरीकांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानतो.
गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते