breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हाथरस घटनेचा आपतर्फे निषेध; मुख्यमंत्री योगीच्या राजीनाम्याची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

आम आदमी पक्षातर्फे (आप) हाथरसमधील घटनेचा निषेध करण्यात आला. सरकार आणि पोलिसांकडून झालेल्या अन्यायाविरोधात आपच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात योगी सरकारविरुद्ध रविवारी जोरदार घोषणाबाजी केली.

‘कुठे आहे महिला सुरक्षा, बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘जो अंतिम संस्कार था, वो भी अत्याचार था’, अशा घोषणा देऊन महिलांनी आक्रोश व्यक्त केला. पीडित तरुणीवर अत्याचार करून मारणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी. त्याचप्रमाणे या घटनेचा सुप्रिम कोर्टामार्फत निकाल देण्यात यावा. भाजप सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी, अशा विविध मागण्या आप अल्पसंख्याक विंग व आप महिला विंगतर्फे करण्यात आल्या.

यशवंत कांबळे म्हणाले, “एकाही नेत्याने या घटनेविरोधात आवाज उठविला नाही. दलित नव्हे, तर कोणत्याही भगिनीवर अन्याय झाल्यास सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या घटनेने अत्याचाराची परिसीमा ओलांडली आहे. या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. त्याकरिता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवावा.”

स्मिता पवार म्हणाल्या, “अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी द्यावी. दहा वर्ष अशा केसमध्ये वाया जात आहेत. निर्भया प्रकरणातहीनऊ वर्षानंतर भगिनीला न्याय मिळाला. यापुढे समाजात मनीषा आणि निर्भयासारखी प्रकरणे जन्माला यायला नकोत. योगी सरकारला बरखास्त करा.” आपचे अल्पसंख्याक विंगचे अध्यक्ष यशवंत कांबळे, वहाब शेख, महिला विंगच्या अध्यक्षा स्मिता पवार, स्वप्नील जेवळे, सागर सोनवणे, सरफराज मुल्ला, पूजा दास, नंदू नारंग, सुशील अजमेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button