breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हातगाडी, स्टॉलवरील कारवाईस तात्पुरती स्थगिती – सहायक आयुक्त श्रीकांत डिसले

– महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या निवेदनानंतर कार्यवाही

– वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याचे आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील विविध चौकातील हातगाडी, स्टॉल धारकांवर शहर पोलिस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून खटले दाखल करण्यात येत होते. याबाबत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने महापालिका व सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांना पत्र दिले होते. यावर आज वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या वेळी हॉकर्स झोन बाबत निर्णय होईपर्यंत कारवाई थांबवु. मात्र कमी जागेत व्यवसाय करावा व रहदारीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले यांनी केले.

या वेळी महापालिका अधिकारी, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संभाजी वाघमारे, मधुकर वाघ, फरीद शेख, प्रकाश साळवे, बालाल सुखवाल, कासिम तांबोळी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व नॅशनल हॉकर फेडरेशनचे अध्यक्ष नखाते यांनी आपली भुमिका मांडली. शहरातील विक्रेत्या वरील कारवाई थांबवावी व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. तसेच शहरातील विक्रेते हे संविधानाने दिलेल्या अधिकारात व्यावसाय करत आहे. फेरीवाला कायदा केला त्याची अंमलबजावणी न करताच स्थानिक अतिक्रमण पथक प्रशासनाकडून पोलिस अधिकाऱ्याकडून अनेक वेळा कारवाईचा त्रास सहन करावा लागत आहे. ५ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये हातगाडी, पथारीवाले यांच्यावर कारवाई करुन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून २१३ गोरगरीब विक्रेत्यांवरवर कारवाई केली. तर वाहतूक पोलिसांनी १५४ खटले दाखल केले.

वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कलम १०२ प्रमाणे खटले दाखल केले आहेत. हा प्रकार म्हणजे मानवतेला काळिमा फासणारा आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. अनेक चौकातील विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये हॉकर्स झोनची निर्मिती करणे तसेच त्यांना योग्य न्याय देणे यासाठी शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असते. मात्र मनपा प्रशासनाच्या वेळ खाऊ धोरणामुळे त्यांचेवर अन्याय होत आहे. तो दूर करावा अशी मागणी महासंघाने केली आहे.

या नंतर लवकरच महापालिका व पोलीस प्रशासन यांचेसमावेत बैठक होणार असल्याची माहिती महासंघाने दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button