हरिनामाच्या जयघोषाने देहूनगरीचा आसमंत भक्तीमय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/FB_IMG_1561368251719.jpg)
- संत तुकाराम महाराज पादुका पालखीचे लवकरच प्रस्थान
देहूगाव – पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी या अंभगा प्रमाणे वैष्णवांचा मेळा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्यासह प्रत्येक भाविक संतांच्या मेळा, आपल्या लाडक्या विठू माऊलीची भेट घेण्यासाठी पंढरीची वाट धरा आणि मोक्षाचे अधिकारी व्हा, असे जणू काही सांगत होते.
वारकरी मंडळी हातात टाळ चिपळ्या, मृदंगाचा निनाद, विना तुतारीच्या तालावर ताल धरत तुकाराम- तुकाराम नामाचा अखंड जयघोष करीत होते. या हरिनामाच्या जय घोषाने संपुर्ण देहूनगरीत आसमंत खुलून निघाला होता. अशा या भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचे आज दुपारी अडीचच्या सुमारास पांडुरंगाच्या भेटीसाठी (आषाढी वारीसाठी)पंढरपुरकडे लवकरच प्रस्थान होणार आहे.
पुण्य उभे राहो आता / संताचे या कारण // पंढरीच्या लागा वाटे /सखा भेटे विठ्ठल // या प्रमाणे समाजातील सर्व धर्म समभावाची व त्यागाचे प्रतिक असलेली भगवी पताका हवेत उंचच उंच नाचवित पांडुरंगाच्या दर्शनासाठी सामाजिक एकतेचे दर्शन घडवित पंढरीच्या वाटेला लागणार आहेत.