breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हनुमंत गावडे यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद उपाध्यक्ष पदी निवड

  • पिंपरी – चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
  • राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी | महा ई न्यूज |

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूक गुरुवार (दि. ५ रोजी) रोशल गार्डन भोसरी येथे संपन्न झाली. या निवडणुकीत परिषदेच्या अध्यक्ष पदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर इतर पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष पदी हनुमंत गावडे हे बहुमताने निवडून आले आहेत.

परिवर्तन पॅनेल सपशेल अपयशी ठरले. या निवडणुकीत सरचिटणीस पदासाठी बाळासाहेब लांडगे यांना ५१ मते तर संदिप भोंडवे यांना ३५ मते मिळाली. लांडगे यांनी १६ मताने विजय मिळवला. उपाध्यक्ष पदासाठी १३ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये हनुमंत गावडे यांचे नामांकन होते. १३ पैकी ६ जण निवडून द्यायचे होते. यामध्ये हनुमंत गावडे यांनी ५२ मते मिळवून विजय संपादन केला. हनुमंत गावडे यांच्या निवडीने पिंपरी चिंचवड शहरात कुस्तीगीर आनंद व्यक्त करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरला प्रथमच कुस्तीतील मोठे पद मिळत आहे.

कोण आहेत हनुमंत गावडे ?

सर्वांना परिचित असलेले गावडे हे देखील नामवंत पैलवान आहे. लहानपणापासून कुस्तीची आवड, गांधी पेठ तालीम येथे  वस्ताद फकीरभाई पानसरे, वडील बाळासाहेब गावडे, सूर्यकांत थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असताना अनेक मैदानं, कुस्ती स्पर्धा, औद्योगीक कुस्ती स्पर्धा, गाजवले आहेत. याचा इतिहास सर्व पिंपरी चिंचवड करांना माहिती आहे. घराण्याची कुस्तीची पंरपंरा जपत असताना मुलगा विजय हनुमंत गावडे याला कुस्तीचे धडे दिले. विजय ने देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  कुस्ती स्पर्ध॓त अनेक पदकं मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. भारत केसरी मान मिळवून शहराचा लौकिक वाढविला आहे. कुस्ती हेच जीवन समजून त्यांचा नातू पैलवान इंद्रजित विशाल गावडे, हा चौथ्या पिढीत कुस्ती करत आहे. 
टेल्को कंपनीत नोकरी करत असताना सन १९८६ साली स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत गावडे भाऊ काँग्रेस पक्षाच्या तिकीट घेऊन निवडून आले. नगरसेवक पद मिळताच महापालिकेत नोकरीसाठी जवळपास १०० पैलवान मंडळींना नोकरी दिली. दरवर्षी महाराष्ट्रातील महानगरपालिका कुस्ती स्पर्ध॓त आपल्या पैलवानांनी पदके मिळवून देणारयास ६ महिन्यांचा कोल्हापूर येथील सराव खर्चास मिंटिग मध्ये मान्यता मिळवून दिली. आज देखील हे जुने मल्ल भाऊंची आठवण काढून सांगतात. सतत २५ वर्ष महानगरपालिका सभासद नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या काळात अनेक कुस्ती हिताचे निर्णय घेतले. १९८९ साली टेल्को कंपनीत झालेल्या संपात अग्रस्थानी राहून कामगारांची एकजूट करून टेल्को कामगार युनियन काढूण युनियन संस्थापक या नात्याने  रतन टाटा यांच्या बरोबर चर्चा करून कामगारांची न्याय हक्काची बाजू मांडून. संप मोडून काढला. सन २००८ साली पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व समावेशक सदस्य यांची निवड करून संघाचे ध्येय व उद्दिष्ट समजावून १३ डिसेंबर २००९ साली ५३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध॓चे आयोजन सांगवी येथे केले. अतिशय सुंदर आकर्षक, नियोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे पदाधिकारी, पंच, कुस्तीगीर यांच्या साठी राहण्यासाठी उत्तम व्यवस्था, सुरूची शाकाहारी मांसाहारी जेवण सर्व पदक विजेत्या कुस्तीगीरास रोख ईनाम यामुळे ही कुस्ती स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. त्याच बरोबर महाबली सतपाल हरिशचंद्र बिराजदार मामा यांची ऐतिहासिक ग्रेट भेट याच कुस्ती स्पर्ध॓त झाली. 
आज पिंपरी चिंचवड शहरात अनेक प्रकारच्या कुस्ती स्पर्धा, गावच्या जत्रेतील आखाडे, मैदानं हे संघाच्या माध्यमातून होत आहेत. होतकरू कुस्तीगीरांना संघाच्या वतीने दत्तक घेणे. राज्य कुस्तीगीर परिषद चे पंच प्रशिक्षण शिबिरे आयोजन करणे. दुखापत ग्रस्त कुस्तीगीर यांना आर्थिक मदत करणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील महापौर चषक कुस्ती स्पर्धा, पिंपरी चिंचवड केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, ग्रिकोरोमण, फ्रिस्टाईल निवड चाचणी, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, त्याचप्रमाणे विशेष बाब महानगरपालिका यांच्या वतीने भोसरी येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, महापालिकेची दत्तक योजना राबविण्यात यावी म्हणून पहिवा प्रस्ताव हा कुस्तीगीर संघाचा होता. आता या योजनांचा लाभ आपल्या शहरातील महिला कुस्तीगीर तसेच पुरूष कुस्तीगीर यांना मिळत आहे.  वरील सर्व कार्याचा आढावा घेतला तर नक्कीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे उपाध्यक्ष पद हे निश्चित मिळणार असे असताना ते पद निवडणूक लढवून आणि जिंकून आणून दिल्याबद्दल सर्व कुस्तीगीर प्रेमींचे मनापासून आभार. 


नवीन पद नवी जबाबदारी या नात्याने शहरातील तिन्ही मतदार संघात कुस्ती संकुलाची उभारणी करणार. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्ध॓चे आयोजन, कुस्ती विकसक शिबिरे, पंच शिबिरे, कुस्ती बौध्दिक वर्ग, महिला कुस्ती संकुल उभारणी, कुस्ती साठी वैद्यकीय शिबिर, आदी गोष्टी करण्याचा मानस गावडे यांनी बोलून दाखवला. दरम्यान, या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी हनुमंत गावडे यांची शुक्रवारी भेट घेऊन शुभेच्या दिल्या. यावेळी भारत केसरी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भांडवलकर उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button