breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर यांच्याकडून कोरोना योध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

पिंपरी / महाईन्यूज

कोरोना काळात जिवावर उदार होऊन ज्यांनी योध्यांप्रमाणे समाजाची रक्षा केली, अश्या चिंचवड येथील तालेरा रूग्णालयातील डॉक्टर, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि चिंचवड ब प्रभागात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी यांचा सत्कार ब प्रभागाचे स्विकृत नगरसेवक विठ्ठल बबनराव भोईर आणि आमदार लक्ष्मण जगताप विचार मंचाच्या वतीने करण्यात आला.

कोरोना काळात डॉक्टर, पोलीस आणि सफाई कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून खऱ्या अर्थाने देश सेवा केली. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांनी कोरोना योध्यांचा मानपत्र आणि दिवाळी मिठाई देऊन सन्मान केला. सफाई कर्मचारी मास्कचे वाटप देखील करण्यात आले.

यावेळी विठ्ठल भोईर म्हणाले, “कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देश भीतीपोटी निर्बंधात होता. मात्र, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस अधिकारी व कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे सदस्य आपआपल्या पध्दतीने कार्यरत होते. खरेतर अशा कोरोना योध्यांचा सन्मान व सत्कार होणे गरजेचे आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर त्यांनाही भविष्यात अशा मोठ्या संकटाला सामोरे जाताना ऊर्जा मिळेल. यासाठी भोईर यांनी समाजयोध्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर कोरोना प्रतिबंधित उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. याप्रसंगी नागेश सदावर्ते, करण खरे, निखिल थोरवे, दत्ता पोपलगत, पप्पू विश्वकर्मा आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button