स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर यांच्याकडून ‘कोरोना योध्यांचा’ कृतज्ञता सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Bhoir.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात आपल्या जिवावर उदार होऊन ज्यांनी योध्याप्रमाणे समाजाची रक्षा केली अश्या चिंचवड येथील तालेरा रूग्णालयातील डॉक्टर, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आणि चिंचवड ब प्रभागात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी यांच्या कृतज्ञता सत्काराचे आयोजन ब प्रभाग स्विकृत नगरसेवक विठ्ठल बबनराव भोईर आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप विचार मंचाच्या वतीने करण्यात आले होतेे.
कोरोना काळात डॉक्टर, पोलीस आणि सफाई कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून खऱ्या अर्थाने देश सेवा केली. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून विठ्ठल भोईर आणि सौ.पल्लवी भोईर यांनी कोरोना योध्यांचा मानपत्र आणि दिवाळी मिठाई देऊन सन्मान केला. सफाई कर्मचारी यांना सन्मानपत्र आणि मिठाई बरोबरच मास्कचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी विठ्ठल भोईर म्हणाले, “कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देश भीतीपोटी घराच्या आत होते. मात्र डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यासह अनेक सामाजिक संस्थाचे सदस्य आपआपल्या पदधतीने कार्यरत होते. खरेतर अशा कोरोना योद्धयांचा सन्मान व सत्कार होणे गरजेचे आहे. त्यांच्या पाठींबावर शाबासकीची थाप दिली तर त्यांनाही भविष्यात अशा मोठ्या संकटाला सामोरे जाताना ऊर्जा मिळेल. त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या कार्याला सलाम..! “
या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंग, मास्क या कोरोना प्रतिबंधित उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. याप्रसंगी नागेश सदावर्ते, करण खरे, निखिल थोरवे, दत्ता पोपलगत, पप्पू विश्वकर्मा आदी उपस्थित होते.