breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटी प्रकल्प ; पिंपळे गुरव-पिंपळे सौदागारमध्ये साकारणार ‘व्हिलेज प्लाझा’

  • या प्रकल्पास सुमारे 48 कोटी रुपये खर्च अपेक्षित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गंत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागार या ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’ भागामध्ये ‘व्हिलेज प्लाझा’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालास स्मार्ट सिटी संचालक मंडळाने मान्यता दिली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक आज (शुक्रवार) महानगरपालिका आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, केंद्र शासन प्रतिनिधी ममता बात्रा, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन, पीएमपी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागीय आयुक्त पी.एस.खांडकेकर, आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर, निळकंठ पोमण, राजन पाटील, लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये पिंपळे गुरव आणि पिंपळे साैदागर याठिकाणी ‘व्हिलेज प्लाझा’ साकारण्यात येणार आहे.  सदरील कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजूरी दिली असून या प्रकल्पासाठी ४८ कोटींच्या खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) राबविण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि पोलिस आयुक्त याच्या वतीने नियंत्रण कक्ष आणि डाटा सेंटर हे निगडी येथील अस्तित्व माॅलची जागा निश्चित करणेत आलेली आहे. त्यानूसार फर्निचर, विद्युत व्यवस्था आदी कामांस मान्यता देण्यात आली. तसेच एरिया बेस डेव्हलपमेंटमधून स्मार्ट टाॅयलेट बनवण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 320.58 कोटी निविदा प्रक्रिया राबविणार आहेत. त्या कामास काैशल्य आधारित व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button