breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट सिटी’च्या निविदेत ‘रिंग’; नाराज नगरसेवक शत्रुघ्न काटेंचा आरोप

नेटवर्कींग कामाची निविदा रद्द करा, आयुक्तांना दिले पत्र 
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील नेटवर्कीग कामाच्या 255 कोटींच्या निवेदत रिंग झाल्याचा संशय आता सत्ताधारी भाजपकडूनच व्यक्त झाला आहे. भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यांनी गैरव्यवहाराचा संशय येत असल्याने ही निविदाप्रक्रिया रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी केली आहे. 
शहरात पॅन सिटी अंतर्गंत केबल नेटवर्किंग कामासाठी महापालिकेने 255 कोटी रुपयांची निविदाप्रक्रिया राबविली. या निवेदेबाबत राष्ट्रवादीने आक्षेप घेत मुख्यमंत्री कार्यालयातून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही निविदाप्रक्रिया पुर्ण झाली असून नागपूरमधील एल अॅन्ड टी ही कंपनी पात्र ठरली आहे. विरोधकांच्या आरोपानंतर यावेळी सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी आयुक्तांना पत्र देत पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात वादातून नको, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निविदापूर्व बैठकीला (प्री-बीड) अनेक कंपन्या आल्या असताना, त्यांनी निविदा भरल्या नाहीत. तीनच ठेकेदारा सहभाही होऊन त्यांनी सुमारे 21 कोटींच्या वाढीव दराने निविदा भरल्या. त्यावरून ही बाब संशयास्पद वाटते. हे काम मंजूर केल्यास पंतप्रधानांच्या नाय भय, ना भ्रष्टाचार या घोषणेला तडा जाईल. त्यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी व पक्षाची प्रतिमा मलीन होईल. देशातील नेतृत्त्व व शहरातील नेतृत्त्वावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत. यासाठी महापालिकेने या कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा करावी, असे शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात म्हटलेले आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button