breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीची थोडक्यात हुकली ‘डबल सेंच्युरी’

  • लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची धास्ती
  • दोनशे कोटींच्या कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आचारसंहितेची चांगलीच धास्ती घेतली आहे. स्थायी समितीने आज ( मंगळवारी) झालेल्या बैठकीत 67 विषयांच्या सुमारे 191 कोटी 76 लाख 39 हजार रुपये खर्चाच्या विकास कामांना मंजुरी दिली. या कामामध्ये सर्वाधिक रस्ते डांबरीकरणात च-होली, वाकड व किवळेतील डीपी रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतू, स्थायी समितीची थोडक्यात डबल सेंच्युरी हुकल्याची चर्चा पालिकेत रंगली होती.  

या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड होत्या. च-होली येथील सर्व्हे क्रमांक 7 ते महापालिका हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील 30 मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी  42 कोटी 77 लाख एवढा खर्च मंजूर करण्यात आला. हे काम मे. मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीतील टेल्को रस्त्यावरील यशवंतनगर चौक ते नाशिक महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मे. एस. के. येवले कंपनीची नेमणूक व 8 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्च मंजूर करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्यावर 1 कोटी 2 लाख, ताथवडे प्रभाग 25 मधील रस्ते विकसित करण्यासाठी 4 कोटी 48 लाख, प्रभाग 8 मधील सेक्टर 7, 10 आणि एमआयडीसी व प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 8 कोटी 66 लाख, याच प्रभागात आणखी एका रस्त्यांसाठी 8 कोटी 66 लाख,प्रभाग 8 मधील रस्त्यांचे डांबरीकरण आणि रस्ते विकासासाठी 17 कोटी रुपये, प्रभाग 3 मोशी गावठाणातील लक्ष्मीनगर भागातले रस्त्यासाठी 8 कोटी 51 लाख एवढा  खर्च मंजूर करण्यात आला. प्रभाग 26 मधील विशालनगर वाघजाई हॉटेल ते कस्पटे चौकपर्यंत 24 मीटर सिमेंट काँक्रीटचा डीपी रस्ता करण्यासाठी 9 कोटी 30 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला. किवळे, विकासनगर येथील नव्याने ताब्यात आलेल्या डीपी व डीपी विरहित रस्त्यांच्या विकासासाठी 10 कोटी 76 लाख, विकासनगर येथील नाल्याकडील पेट्रोल पंप ते बापदेवनगर हा 18 मीटर डीपी रस्ता करण्यासाठी 16 कोटी 32 लाख एवढा खर्च मंजूर करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button