breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा बलात्कार, पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी / महाईन्यूज

अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून करणा-या फरार सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली. तब्बल सातशे ते आठशे सीसीटीव्हीचे छायाचित्रण तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे भोसरी पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर आरोपीला बेड्या ठोकल्या.

विजय बबन चव्हाण (वय ४०, रा. दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीवर (वय १५ वर्षे) बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना डिसेंबर २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात आरोपीने पळून जाण्यासाठी रिक्षा वापरल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तब्बल सातशे ते आठशे सीसीटीव्हीचे चित्रण तपासले. त्यानुसार संबंधित रिक्षा भूगाव येथे सापडली. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

आरोपी वेशभूषा बदलून एका महिलेसह गोव्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक आणि ससून परिसरात सापळा रचला. पोलिसांना त्याने अजय दीनानाथ असे नाव सांगून पळ काढण्याचा प्रयल केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफिने पकडून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button