breaking-newsपिंपरी / चिंचवड

साने- गाढवे परिवारातर्फे विवाहानिमित्त होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला १ लाखांचा धनादेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुमुळे आर्थिक कंबरडे मोडलेले असल्यामुळे साने-गाढवे परिवारातर्फे विवाहानिमित्त होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १,००,००० रुपये चेक स्वरूपात देण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक प्रविण धर्माजी साने यांचा विवाह सोहळा १७ मे २०२० रोजी पार पडला. मु. पो. आर्वी, ता. जन्नर येथे दहा लोकांच्या उपस्थितीत सर्व नियमांच्या चौकटीत राहून विवाह झाला. यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

विवाहनिमित्ताने होणा-या खर्चाला फाटा देऊन विवाह पुढे न ढकलता नियोजीत वेळी करून समस्त साने व गाढवे परिवारात सध्या जागतिक महामारी कोरोना विषाणूवः प्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचे आम्ही दोन्ही परिवारांनी ठरवले. दोन्ही परिवारातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,००,००० रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button