breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आयुक्तांचा आदेश, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शासनाने 2 ऑगस्ट 2019 मध्ये मनपाच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय दिला. मात्र, स्थानिक पातळीवर प्रशासकीय उदासिनतेमुळे तो लागू झाला नाही. आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेतल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासंदर्भात नुकताच आदेश काढला आहे. आता मनपा प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने 2 ऑगस्ट 2019 रोजी स्वतंत्र निर्णय दिला. राज्यातील महापालिका आयुक्तांना तो निर्णय लागू करण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र, प्रशासकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. अनेकदा प्रशासनाच्या विरोधात लढा उभा केला. तरी त्याला दाद मिळाली नाही. अखेर महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी शिक्षकांच्या सहमतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार होता.

आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर तुर्तास मोर्चा मागे घेण्यात यावा, अशी सूचना देखील शिक्षक संघटनेला केली होती. आमदारांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बैठक लावून त्यामध्ये शिक्षकांचा हा मुद्दा कायमस्वरुपी मार्गी लावला. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील काल शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश शिक्षण प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना दिले.

भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिक्षक संघटनेला पाठिंबा दर्शविला होता. प्रशासनाच्या विरोधात मोर्चा न काढता यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. शिक्षकांची बाजू समजून घेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन्ही आमदारांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ख-या अर्थाने शिक्षकांचा ऑगस्ट 2019 पासून रखडलेला सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याबद्दल मनपाच्या सर्व शिक्षकांच्या वतीने दोन्ही आमदारांचे, आयुक्तांचे मनपूर्वक आभार.

मनोज मराठे, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button