breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवीतील मोकाट वळूचा बंदोबस्त करा; आण्णा जोगदंड यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

सांगवी परिसरातील विविध चौकात व गल्ली बोळात वळू मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. पावसाळी वातावरणामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. अशात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वळूंनी दहशत निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या मधोमध वळू, मोकाट गाई, वासरे अशी जनावरे ठाण मांडूण बसलेले आसतात त्यामुळे, अपघाचे प्रमाणात वाढ झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यावर उभे असलेले वळू नागरिकांना नेहमीच टक्कर देताना पहावयास मिळत आहेत.

सांगवीतील फेमस चौकात असेच चित्र पहायला मिळत आहे. वळूच्या निर्माण झालेल्या दहशतीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिक वळूंना घाबरून पळ काढताना दिसत आहेत.

महानगरपालिकेने अशा मोकाट जनावरे व वळूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने संस्थाध्यक्ष विकास कुचेकर व शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास शहाणे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button