सांगवीतील कांकरिया गॅस ऐजन्सीचा मनमानी कारभार, ग्राहकांची घरपोच सेवा केली बंद
पिंपरी|महाईन्यूज| प्रतिनिधी
सांगवी कांकरिया ऐजन्सीज कार्यालयात मालकासोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारणा केली असता उडवाउडविची उत्तरे देण्यात आली आहे. नियमानुसार ग्राहकांना घरपोच सिंलेडर देणे बंधनकारक असतानाही कोरोनाच्या नावाखाली नागरिकांना घरपोच सिंलेडर देणे बंद केले आहे.
अनेक तक्रारी आल्या होत्या. गेली अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. अतिआश्यक सेवा असतानाही मालकाची मनमानी चालू आहे. इतर गॅस ऐजन्सीज घरपोच सिंलेडर देत आहेत. मग कांकरियाच का देत नाही ? गॅस नसल्याने नागरिकांना घरी जेवण बनविण्याची अडचन होत आहे. बाहेरूनही जेवण मागवू शकत नाहीत. कारण हॅाटेल्स बंद आहेत. जास्त करून जेष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण सिंलेडर आण्यासाठी घरी कोणीही नसते.
एचपी गॅस ऐरया (विभागीय) मॅनेजर कुमार यांना विचारले असता त्यांनी सांगितलं आहे की, घरपोच सिंलेडर ग्राहकांना देऊ नका असा काही जीआर काढला आहे का ? तर नाही असे उत्तर दिले. मग कांकरिया ऐजन्सीची त्यांच्याकडे फोन वरून तक्रार केली आहे. त्वरित उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. जर काही दिवसात नागरिकांची गैरसोय दुर न झाल्यास मनसेकडून लेखी किंवा मेलद्वारे कांकरिया ऐजन्सीजवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार करणार आहे.