breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरसकट कर्जमुक्ती, ‘करुन दाखवलं’, शिवसेनेची पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी; महाविकास आघाडीचा नामोल्लेख टाळला

महाविकास आघाडीमधील काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस स्थानिक पदाधिका-यांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सरसकट कर्जमुक्ती, करुन दाखवलं, या आशयाचे शिवसेनेकडून पिंपरी-चिंचवडमध्येही सर्वत्र बॅनर झळकले आहेत. मात्र, त्यावर महाविकास आघाडीतील काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांचे नामोल्लेख जाणिवपुर्वक टाळण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पदाधिका-यांकडून नाराजी सूर उमटू लागला आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्याआधीच शिवसेनेनं बॅनरबाजी करण्यास सुरुवात करुन कर्जमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होवू लागला आहे.

मुंबई, औरंगाबादसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी शिवसेनेनं कर्जमाफीची जाहीरातबाजी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एम्पायर इस्टेट पुलानजीक शिवसेनेने मोठे बॅनर लावले आहे. त्यावर गोर गरीबांच्या पीक कर्जावर 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमुक्ती, करुन दाखवलं!, असा मजकूर लिहण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यतरिक्त कोणत्याही नेत्याचा फोटो नाही.

दरम्यान, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील काही काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस स्थानिक पदाधिका-यांना शिवसेनेच्या फ्लेसबाजीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याबाबत उघडपणे प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. याबाबत प्रदेशपातळीवरील नेतेमंडळीच योग्य तो निर्णय घेतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

राज्यात सत्ता कोणाची आहे, हे राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात राहणा-या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे. शेतक-यांची कर्जमाफी कोणी केली याबाबत सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणी करू नये. फ्लेक्स लावणा-यांनी महाविकास आघाडीचा नामोल्लेख करायला हवा होता. त्यांनी तो केला नाही. असो, दुनिया सब जानती है.

  • सचिन साठे, शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button