breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ता स्थापन होत असताच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

  • शरद पवार यांच्याशी केली महत्वाच्या मुद्यांवर चर्चा
  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही घेतली भेट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. ही आनंदाची बातमी समजताच पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत करून नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जो लढा दिला, त्याला यश आल्याने शहर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड शहर आणि शरद पवार व अजित पवार यांचे गहन नाते आहे. येथील प्रत्येक नागरिकांना शहराचा विकास कोणी केला, हे वेगळे सांगायची गरज नाही. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी केलेली कोंडी फोडून नाट्यमय घडामोडींचा पट सादर करत शरद पवार यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सोपा करून घेतला. शरद पवार यांच्या डावपेचापुढे दंड थोपटणा-या भाजपला राजकीय मैदानातून सपशेल माघार घ्यावी लागली. सर्व प्रशासन यंत्रणा हाताशी ठेवून भाजपने निर्माण केलेल्या संकटांना तोंड देऊन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या शरद पवार यांचे देशभरातून कौतुक होत आहे.

पवारांच्या या दैदीप्यमान यशानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे यांनी आज मुंबईत जाऊन पवारांची भेट घेतली. बराचवेळ चर्चा करून संजोग वाघेरे यांनी शहरातील पक्षाच्या परिस्थितीबाबतची माहिती सांगितली. मयूर कलाटे यांनी सुध्दा शहराच्या विकासाचे मुद्दे मांडले. राजू मिसाळ यांनी देखील महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. त्यांच्यासोबत शहरातील राष्ट्रवादीचे अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

दादांची भेट होताच कार्यकर्ते खूश

पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे नाते असताना येथील प्रत्येक कार्यकर्ता हा दादांचा चाहता आहे. दादांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शहरातील प्रत्येक कार्यकर्ता भावनीक झाला होता. अशा भावुक वातावरणात साहेबांसोबत रहावे की दादांसोबत, अशा बुचकळ्यात कार्यकर्ते अडकले होते. एकही कार्यकर्ता मोकळेपणाने बोलायला तयार नव्हता. मात्र, तीन दिवसांच्या या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन परतीचा मार्ग धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांना कमालीचा आनंद झाला. त्यांनी आज मुंबईत अजित दादांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबत आमदार आण्णा बनसोडे हे देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button