breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन थेरगाव येथे उत्साहात

पिंपरी | प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन दिन थेरगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्य कार्याध्यक्ष गणेश दहिभाते उपाध्यक्ष सतीश काळे यांच्या हस्ते जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि सर्व उपस्थित समाज बांधवांचे पुस्तक व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.

मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव सर म्हणाले कि मराठा बहुजन समाजाला मराठामार्ग आणि जिजाऊ संदेश या मासिकातून प्रगतीचा मार्ग दाखवला मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख निर्माण करणारी संस्था अॅड शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी १९९० साली स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, असे ऐकून ३३ कक्ष कार्यरत आहेत.
बळीराजा संशोधन केंद्र, शंभर एकर वर जिजाऊ सृष्टी आणि सिंधू संस्कृती संशोधन केंद्राचे काम सुरु आहे. समाजाला “जय जिजाऊ जय शिवराय”, “एक मराठा लाख मराठा” अशी आपुलकीची घोषवाक्यं दिली. पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवुन ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात लावुन घेतले.
विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली. १२ जानेवारी जिजाऊजयंती सिंदखेडराजा, १९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी, १४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर, ६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड. हे उत्सव सुरु करुन मराठा सेवा संघाने समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे. धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके देउण महाराष्ट्रातील जातीय दंगली थोपवण्यासाठी मराठा सेवा संघाचं योगदान मोठं आहे. बुट पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत मराठा तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी सेवा संघानी प्रयत्न केले. तसेच मराठा अविवाहित मुलांचा विधवा मुलींशी लग्न लावून समाजापुढे एक मोठा आदर्श घालून दिला आहे.
लाल महालातून वादग्रस्त दादुजी कोंडदेव शिल्प सर्व संघटनांना सोबत घेऊन काढण्यात आल.
मराठा आरक्षणासाठी अनेक परिषदा घेऊन महाराष्ट्रभर जनजागृती करुन मराठा आरक्षण देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. सत्य इतिहास जगासमोर आणून अनेक लेखक ,वक्ते ,व्याख्याते, शाहीर तयार केले आहेत तसेच अनेक वेळा देशातील आपत्तीच्या काळात भरघोस आर्थिक मदत ही मराठा सेवा संघाने केली आहे.
या वेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, राजेश गुंड, अतुल कदम, हणुमंत चव्हाण, विनोद घोडके, प्रशांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व परमेश्वर जाधव यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button