breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडचा सणांवर बहिष्कार, गृहमंत्र्यांना दिले पत्र

  • श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यास पोलिसांची टाळाटाळ
  • छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याने भावनेला हात

पिंपरी / महाईन्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनामी करणारा कपोलकल्पीत इतिहास सादर करून रामदास स्वामींचे उदात्तीकरण करणारे श्री श्री रविशंकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही कोणताही सण, समारंभ साजरा करणार नाही, असा पवित्रा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी घेतला आहे. त्यामुळे आज मकर संक्रांतीच्या सणावर देखील त्यांनी बहिष्कार टाकला आहे.  

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दूर-दूर कसलाही संबंध नाही, हे एका खटल्यात औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठाने जाहीर केले आहे. तरी देखील श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून रामदास स्वामीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री श्री रविशंकर यांनी हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज स्वारज्य सांभाळून व लढाया करून थकून गेले आहेत. त्यावेळी रामदास स्वामी स्वराज्याचे राजे आहेत. शिवाजी महाराज रामदासाचे शिष्य आहेत. शिवाजी महाराजांनी स्वामींच्या पायाजवळ गुडघे टेकून आपला मुकूट व तलवार रामदासांच्या चरणी अर्पण केल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले. याच आशयाचा लेख देखील त्यांनी वृत्तपत्रातून प्रसिध्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान झाला आहे. महाराजांचा अशा रितीने बदनामीकारक इतिहास प्रसारित करणारे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी 2 जानेवारी 2020 पासून पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड व वाकड पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज केला आहे. निवेदने दिली आहेत. आंदोलने देखील केली आहेत.

तरी, पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ख-या इतिहासाची जाणूनबुजून मोडतोड करणे, महाराजांना कमी लेखने, रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तरी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना त्वरीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button