breaking-newsपिंपरी / चिंचवड

संत तुकारामनगरमध्ये शिपवर कामाला लावण्याच्या बहाण्याने तरुणाला गंडा

मर्चन्ट नेवीचा डिप्लोमा झालेल्या एका तरुणाला शिपवर कामाला लावण्याच्या बहाण्याने तब्बल ४ लाख १० हजारांचा गंडा घालण्यात आला. ही घटना मार्च ते १ जून २०१९ दरम्यान संत तुकारामनगर, वायसीएम हॉस्पीटल जवळील अॅड. सुरज डी. खाडे यांच्या कार्यालयात घडली.

याप्रकरणी दिगंबर नंदकुमार मानकर (वय २०, रा. ओळकाईवाडी, प्रभुकृपा बिल्डींग, वार्ड क्र. ३, गुरववस्ती रोड, लोणावळा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋगवेद संजय अमदाबादे (वय २५, रा. बिल्डींग क्र.७०, फ्लॅट क्र. १६, सेक्टर २, इंद्रायणीनगर, भोसरी) या तरुणाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिगंबर यांचा मर्चन्ट नेवीचा डिप्लोमा झाला आहे. यामुळे ते कामाच्या शोधात होते. मार्च ते १ जून २०१९ या कालावधीत आरोपी ऋगवेद याने दिगंबर यांना शिपवर कामाला लावतो असे आश्वासन दिले. आणि त्यासाठी दिंगबरकडून वेळोवेळी असे एकूण ४ लाख १० हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून देखील ऋगवेदने दिगंबर यांना कुठल्याही शिपवर नोकरी लावून दिली नाही. तसेच घेतलेली ४ लाख १० हजारांची रक्कम परत न करता फसवणूक केली. आरोपी ऋगवेद याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हरीदास बोचरे तपास करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button