breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मॅग्झीन चौकात भक्तीमय वातावरणात स्वागत

पिंपरी, (महाईन्यूज) – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज दिघीतील मॅग्झीन चौकात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.

बघू नका फरक मार्गांत | भावना पहा साधकाच्या -हदयात |
मनातील भेद मग मावळतात | सुमती सहिष्णुतेची उद्भवेल जीवनात ||

अशी साद घातल विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला अखंड वारकरी समुदाय पंढरीच्या दिशेने धाव घेत होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भेट वस्तू देण्यात आल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे कालच आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. आज सकाळी लवकर उठून खांदेकरी, चोपदार, विणेकरी, टाळकरी, पाकवाज वादक यांनी पालखीच्या प्रस्थानाची तयारी केली. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींची पालखी दिघीतील मॅग्झीन चौकात दाखल झाली. याठिकाणी आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पालखीचे प्रथम स्वागत करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी देखील माऊलींच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

आळंदी ते दिघी मार्गावर सर्वत्र वारकरी समुदाय लोटला होता. राज्यातून तसेच परप्रांतातून पालखी सोहळ्यात दाखल झालेल्या दिंड्या दरमजल करीत पंढरीच्या दिशेने कूच होत होत्या. त्यांचे स्वागत आणि भेट वस्तू देण्यासाठी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सेवा पुरवित होते. दिघी, मोशी, भोसरी, चोविसावाडी, च-होली आदी भागातील भाविकांनी माऊलींच्या पालखीचे मनपूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर पालखीला दिघी परिसरात निरोप देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button