breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘संतपीठ’ उभारण्याच्या कामात ‘सल्ला चुकला”, महापालिकेने सल्लागारचं बदलला

  • स्थायी समितीपुढे सल्लागार बदलीचा प्रस्ताव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – टाळगाव चिखलीत जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. गैरव्यवहाराचे आरोप आणि सर्व वाद निकाली काढत अखेर महापालिकेने ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, चुकीचा सल्लागार नियुक्त केल्याने संतपीठाचे काम थांबले असून आता याच प्रकल्पासाठी नवीन सल्लागार नेमण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा. वारकरी सांप्रदायाचे पारंपारिक शिक्षण जनमाणसाना मिळावे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखलीत 80 गुंठे जागेत जागेत हे संतपीठ उभारण्याचा निर्णय घेतला. या संतपीठाच्या इमारतीसाठी तब्बल 45 कोटी 9 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम बी. के. खोसे एजन्सीला वाढीव दराने दिल्याने आरोप झाला. त्यात गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशीत कोणत्याही त्रृटी नसल्याचा निर्वाळा करत ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.

दरम्यान, संतपीठाच्या निविदाप्रक्रियेवरून आपली बाजु प्रशासनाने सावरून घेतली. मात्र. या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागाराने पालिकेला अडचणीत आणले. मे. नुयोग जबुवानी या सल्लागार संस्थेची वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. मात्र, हा सल्लागार काम करत नसल्याने संतपीठाचे काम रखडले आहे. त्यासाठी . मे. नुयोग जबुवानी या सल्लागाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येत आहे. आता पालिकेने मे. निओजन आर्किटेक्ट अॅन्ड कन्सलटंट यांची संतपीठासाठी वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक करण्याची शिफारस स्थायी समितीकडे केली आहे.

 

संतपीठ कामास 45 कोटीचा खर्च

चिखलीतील सर्व्हे क्रमांक 1653 मधील 1 हेक्टर  80 गुंठे जागेत हे संतपीठ उभारले जाणार आहे. संतपीठाच्या 5 मजली इमारत बांधकामाचा ठेका बी. के. खोसे यांना देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. ‘एसआरआर’ दरानुसार या कामास 45 कोटी 9 लाख रूपये खर्च येणार आहे. संतपीठाच्या 5 मजली इमारतीचे बांधकाम 1 लाख 60 हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे. त्यामध्ये एकूण 48 वर्ग आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या ‘स्मार्ट क्लास रूम’प्रमाणे या वर्गाची रचना असणार आहे. संगणक लॅबचे 3 कक्ष, 3 ग्रंथालय, 7 शास्त्र प्रयोगशाळा, 2 सेमिनार हॉल असणार आहेत. सर्व मजल्यावर स्वच्छतागृह असणार आहे. तळमजल्यावर 1,500 चौरस मीटरचे आणि जमीन समांतर 2,904 चौरस मीटर क्षेत्रफळाचे वाहन पार्किंग असणार आहे. कामाची मुदत अडीच वर्षे आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button