शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांच्यावर मोठी जबाबदारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/A-Gallery_1-1.jpg)
– वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेनेच्या सल्लागार पदी नियुक्ती
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेना संघटनेची विभागनिहाय प्रादेशिक कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील संतोष सौंदणकर यांची प्रादेशिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य पदी केलेल्या कामाचा गाढा अनुभव लक्षात घेता सौंदणकर यांच्यावर पुणे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये असंख्य कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेना ही राज्यव्यापी संघटना कार्यरत आहे. संघटनेची पुणे, कोकण, मराठवाडा तसेच नागपूर विभागाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुणे विभागाच्या अध्यक्ष पदी राजेश गाढवे यांची नियुक्ती झाली आहे. तर, सल्लागार पदी संतोष सौंदणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोहर शिंदे यांची भोसरी सभासद पदी निवड केली आहे. संघटनेच्या कामकाजाची गतीमानता, अधिकारी-कर्मचा-यांची एकजूट करणे, त्यांच्या समस्या, मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात लढा उभारणे आदी कामकाज मार्गी लावण्यासाठी सल्लामसलत होण्याच्या उद्देशाने काम करण्याचे शिवधनुष्य मा. सौंदणकर यांच्या खांद्यावर दिले आहे. यानिमित्ताने संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश गाढवे आणि भोसरी सभासद मनोहर शिंदे यांनी सौंदणकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
सौंदणकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य पद घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. विद्युत विभागातील प्रत्येक बाबींचा सौंदणकर यांचा सखोल अभ्यास आहे. जोडिला कायद्याचे अचूक ज्ञान असल्यामुळे प्रशासनाच्या चुका त्यांना अचूकपणे टिपता येतात. त्यामुळे अधिकारी- कर्मचा-यांच्या समस्या सोडवून त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी सौंदणकर नक्कीच अग्रेसर राहतील, असा विश्वास संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश गाढवे यांनी व्यक्त केले.