‘शिवगान स्पर्धा २०२१’ चे पारितोषिकचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते वितरण
!['Sivagan competition 2019' Che Paritoshche Mayor Usha alias Mai Dhore Yanchaya Haste distribution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/shivgan.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
‘शिवगान’२०२१ स्पर्धेच्या पारितोषिकचे बक्षीस वितरण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा सांस्कृतिक आघाडी व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परीवार यांच्या वतीने शिवजयंती व भरतमुनी जयंतीचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शिवगान’२०२१ स्पर्धेचे आयोजन केले होते. चिंचवड येथिल मोरया गोसावी समाधी मंदीर प्रांगणात हा कार्यक्रम झाला. सायंकाळी मोरया गोसावी समाधी मंदीर प्रांगणात दिवसभर चालू असलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यात आला.
या प्रसंगी भाजप शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, नगरसेविका उषा मुंडे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी नरेंद्र आमले, प्रदेश युवा मोर्चा सदस्य देवयानी भिंगारकर व अजित कुलथे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे व सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांनी पुढाकार घेतला.
शिवगान’ स्पर्धेच्या सांघिक विभागाचा प्रथम क्रमांक शाहीर महर्षी आत्माराम पाटील कलामंच यांनी पटकावला. या वेळी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते 11 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन शाहीर महर्षी आत्माराम पाटील कलामंच्या संघास गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी स्वरसाधना संघास 7 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांकासाठी विजयी संघ पर्णवी शवकरे यांना 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ कृष्णा श्रीराम मंचरकर व रोहिदास माने या संघाना रोख रुपये व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक सई ठकार या विजयी ठरल्या त्यांना 7 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी श्रेयस डांगे यांना 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
तर तृतीय क्रमांकासाठी विजयी झालेले महेश देशपांडे यांना 3 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकासाठी शमिका माईणकर, द्वितीय क्रमांक नेहा कुलकर्णी, तृतीय क्रमांक अनमोल हुंडाळकर हे स्पर्धक विजयी ठरले या सर्वांना रोख रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून रामेश्वर डांगे, अपर्णा कुलकर्णी, चिंतामणी नातू या मान्यवरांनी काम पाहिले. सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले. तर सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांनी आभार मानले.