Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शिवकालीन मर्दानी खेळांचा शालेय खेळात समावेश करा – मर्दानी खेळ महासंघ
![Include Shiva-era masculine sports in school sports](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/barane.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पारंपरिक मर्दानी खेळा विषयी लोकसभेत विषय मांडावे. शालेय खेळात तसेच खेलो इंडिया अंतर्गत महाराष्ट्रातील पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मर्दानी खेळ महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून यांनी केली. खासदार श्रीरंग बारणे यांना राज्य संघटनेच्या वतीने या बाबत निवेदन दिले.
या वेळी मर्दानी खेळ महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे, पदाधिकारी रविराज चखाले, गणेश मांढरे, सुदर्शन सुर्यवंशी, स्मिता धिवार, निलम कांबळे, गणेश गेंजगे, हरपाल जाधव हे उपस्थित होते.