breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण प्रशासन अधिका-यांची समिती पदाधिका-यांकडून गळचेपी

  • अवास्तव, नियमबाह्य काम करण्यास वाढतोय दबाव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील पदाधिका-याकडून शिक्षण विभाग प्रशासन अधिका-यांवर दिवसेंदिवस दबाव वाढत चालला आहे. त्यांच्याकडून अवास्तव आणि नियमबाह्य कामकाजाची अपेक्षा होत असून ती कामे न केल्यास वारंवार बदलीची भाषा समितीतील सदस्यांकडून बोलली जात आहे. त्यामुळे शिक्षण प्रशासन अधिका-यांनी नेमकं काम करायचे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान, शिक्षण समितीने प्रशासन अधिका-यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत त्यांना परत शासन सेवेत पाठविण्याचा ठराव आज (गुरुवारी) सभेत मंजुर करुन महासभेकडे शिफारस केला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभाग प्रशासन अधिका-यांविरोधात सर्व सदस्य एकवटले आहेत. त्यांनी आज (गुरुवारी) पाक्षिक सभेत अकार्यक्षमतेवर ठपका ठेवत शासन सेवेत परत पाठविण्याचा ठराव समंत केला. महापालिकेच्या 105 शाळा, 1150 मुख्याध्यापक, शिक्षक आणि सुमारे 40 हजार विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण विभागावर नियंत्रण राखण्याची जबाबदारी त्यांची आहे.

सद्यस्थितीत त्यांचे कामकाज चांगले नसून अनेक तक्रारी वाढले आहेत. सोपविलेले कामे करण्यास त्या टाळाटाळ करीत आहेत. त्या कामे करण्यास अकार्यक्षम असून त्यांच्या दुर्लक्षाने शाळांची पटसंख्याही कमी होईल, त्यामुळे त्यांना शासन सेवेत परत पाठवा, असा ठराव शिक्षण समितीने केला असून त्या ठरावाची शिफारस महासभेकडे केली आहे. सदरील ठराव सदस्य प्रस्ताव असल्याने तो ठराव आम्ही महासभेपुढे ठेवणार असून त्यावर महासभेत निर्णय होईल, असे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शिक्षण विभाग प्रशासन अधिका-यांकडून पदाधिका-यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझे सर्व कामकाज नियमानुसार आहे. कोणतेही कामकाज नियमाबाह्य करणार नाही. शिक्षण समितीतील सदस्यांनी अवास्तव आणि नियमबाह्य कामकाजाची अपेक्षा माझ्याकडून करु नये, तसेच मी कुठलेही चुकीचे काम करीत नाही. त्यामुळे आम्ही कुठेही काम करण्यास तयार आहे. मात्र, वारंवार धमकीची भाषा बोलून सदस्यांनी माझा अवमान करु नये, असे ज्योत्स्ना शिंदे यांनी महाईन्यूजशी बोलताना सांगितले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button