breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय साहित्य वाटपात दिरंगाई ; महापाैर राहूल जाधव यांची आयुक्तावर नाराजी

  • चार दिवसात विद्यार्थ्यांना सर्व साहित्य देवू, महापाैरांचे आश्वासन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या आडमुठ्या धोरणामुळे महानगरपालिका शाळेत शिकणा-या सुमारे 55 हजार विद्यार्थ्यांना गणवेशाअभावी शाळेत जावे लागत आहे. शाळा सुरु होवून आठवडा लोटला, तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे महापालिकेसमोर आज (बुधवार) विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्यावर महापाैर राहूल जाधव यांनी आयुक्तांवर नाराजी व्यक्त करीत शालेय साहित्य वाटपात दिरंगाई झाली असल्याचे कबूल केले. तसेच येत्या चार दिवसात सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येईल, असे आश्वासन महापाैरांनी दिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 130 प्राथमिक, 18 माध्यमिक व 207 बालवाडी शाळा कार्यरत आहेत. त्या शाळांमध्ये सुमारे 55 हजार विद्यार्थी शिकत आहेत. मागील कित्येक वर्षापासून शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. मात्र, सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात शाळा सुरु होवून आठवडा लोटला आहे. तरीही अजूनही शालेय साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे पालक वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

महापाैर राहूल जाधव म्हणाले की, महापालिका शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांनी शालेय साहित्यांचे वाटप अजून झालेले नाही. शालेय साहित्य वाटपात आयुक्तांनी तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते. त्याच्याकडून खुपच विलंब झालेला आहे. महापालिका शाळांची पटनोंदणी देखील वाढलेली आहे. काही कारणास्तव शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपास दिरंगाई झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे येत्या चार दिवसात शालेय साहित्याचे वाटप लवकरच करण्यात येईल, असे महापाैरांनी महा ई न्यूजशी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button