breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘शादी डाॅट काॅम’ वेबसाईटवरुन होणा-या सासर-याला घातला लाखोचा गंडा

पिंपळे गुरव ( महा ई न्यूज ) – ‘शादी डॉट कॉम’ या विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख झालेल्या एका तरुणाने भावी सासरऱ्याला लोखोंचा गंडा घातला. त्या तरुणाने सासऱ्याकडील १५ तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि कागदपत्रे घेऊन पोबारा केला. ही घटना पिंपळे-गुरव येथे घडली.

याप्रकरणी सुशीला पॅट्रीक डिसोझा (वय ५३, रा. दापोडी रोड, पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मधुकुमार भास्करन (रा. टॉम लिसन चर्च, सिटा गुट, तुमवूâर, कर्नाटक) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसोझा आणि आरोपी मधुकुमार यांची ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाली. डिसोझा यांच्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे मधुकुमार याच्याशी लग्न करण्याचे ठरले. मधुकुमारने मुलीचा मानपानही केला. मुलीच्या डोक्यावरील जखमेवर उपचार करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने मुलीचे १५ तोळयाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, आधारकार्ड, एटीएम कार्ड आणि पॅनकार्ड असा लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केला. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गवळी तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button