शहरात घुमू लागला ढोल-ताशांचा दणदणाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/3pimpri_dhol_tashe.jpg)
पिंपरी – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.
चिंचवड येथील एका ग्रुपचे प्रमुख तुषार दिघे म्हणाले, ‘‘आमच्या ग्रुपकडून गणेशोत्सवातून ढोल वाजविण्याच्या उत्पन्नातून मिळालेल्या रकमेतून बचत करून समाजोपयोगी उपक्रम राबवितो. गतवर्षी अशाप्रकारे दहा हजार रुपयांची बचत करून आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी दिली. ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कोणालाही बिदागी देत नाही.’’
चिंचवड येथील पथकात काम करणारी पूजा बत्तलवार म्हणाली, ‘‘ढोल-ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे. या कलेची जोपासना करणे आवश्यक वाटत असल्याने मी एका ग्रुपमध्ये सहभागी झाले.’’ गेल्या तीन वर्षांपासून मी एका ग्रुपमध्ये ताशा वाजविण्याचे काम करतो. त्यामुळे करमणुकीसह मानसिक ताण कमी होतो.